भोर ! धुक्याच्या दाट चादरीत तालुका हरविला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
दाट धुक्याच्या चादरीत भोर तालुका रविवार दि-५ पहाटे पासूनच पूर्णतः हरविला गेल्याने  मॉर्निंग ऑकला जाणाऱ्या नागरिकांना पर्यटनस्थळी फिरायला गेल्या सारखेच वाटू लागले होते.मात्र बहुतांशी नागरिकांनी या  निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटला.
          पूर्णतः सकाळी ९ वाजेपर्यंत दाट धुके असल्याने वाहनचालकांना सकाळी प्रवास करताना त्रास सहन करावा लागला.नागरिकांनी धुक्याचा आनंद लुटला असला तरी हे धुरकट वातावरण रब्बी पीकांसाठी घातक असून रब्बीतील ज्वारी,हरभरा,गहू या महत्वाच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होणार असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.

To Top