मोठी बातमी ! 'सोमेश्वर'च्या सभासदांना मिळणार एकरकमी एफआरपी : अशी असेल एफआरपी ची रक्कम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चालू वर्षी तुटणाऱ्या उसाला प्रतिटन २६१३ रुपये एकरकमी एफआरपी काल जाहीर केल्यानंतर आज बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने संचालक मंडळाच्या मासिक सभेत चालू हंगामात तुटणाऱ्या उसाला प्रतिटन २८६७ रुपये एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे.  
            आज सोमेश्वर कारखान्यावरील जिजाऊ सभागृहात संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, संचालक सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, जितेंद्र निगडे, प्रवीण कांबळे, प्रणिता खोमणे त्यांच्यासह सर्व उपस्थित होते.यावेळी बोलताना अध्यक्ष जगताप म्हणाले की, पैशांची उपलब्धता होताच एकरकमी २८६७ रुपये एफआरपी सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचे सांगितले. 
           
To Top