औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन

Pune Reporter
मुंबई, दि. ३० :
 कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करणे आणि विद्यमान खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन व्यवसाय/ जादा तुकडी/ व्यवसाय बदल करण्याकरिता ऑनलाईन अर्ज करणे. यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील विद्यमान खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना तसेच नवीन खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास इच्छुक असलेल्या संस्थांनी http://vti.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 31 डिसेंबर 2021 पर्यंत पुन्हा पोर्टल सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे.

इच्छुक विद्यमान खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच नवीन खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास इच्छुक असलेल्या संस्थांनी ऑनलाईन अर्ज करावेत. मात्र त्याकरीता डी.जी.ई.टी. नवी दिल्ली यांचे दि.4 ऑगस्ट 2021 चे पत्रात नमूद केलेल्या अटी व शर्ती ह्या कायम राहतील, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, मुंबई शहर यांनी कळविले आहे.
To Top