सोमेश्वर रिपोर्टर टीम - - -
पुणे दि ३०
राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन चे रुग्ण लक्षणीय वाढ दिसून येत असून अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांवर ती निर्बंध घालण्यात आले असून राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचनांची अवलंब करण्याचे आदेश जारी असताना मोठ्या राजकीय नेत्यांच्या शुभकार्यामध्ये आता कोरोनाने एंट्री केली असून काल खासदार सुप्रिया सुळे , सदानंद सुळे व त्यांचे संपूर्ण सुळे कुटूंब याचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आली आहेत.
त्यांच्या जोडीला आता राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यापाठोपाठ माजी मंत्री व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून या दोघांनीही दि२८ डिसेंबर रोजी मुंबईतील ताज पॅलेस येथे पार पडलेल्या अंकिता पाटील यांच्या विवाह सोहळ्यात हजेरी लावली होती यामध्ये राज्यातील अनेक प्रतिष्ठित राजकीय, व्हीव्हीआयपी मंडळींनी हजेरी लावली होती त्यामुळे आता अजून किती जणांची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.