भोर : तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले : भात पिकांचे नुकसान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याला अवकाळीच्या रिपरिप पावसाने बुधवार दि-१ पहाटेपासूनच झोडपून काढल्याने रब्बीतील पिकांना जीवदान मिळाले आहे.मात्र अवकाळीच्या भीतीने खरिपातील कापणी न केलेले भात पीक भिजल्याने कही खुशी कही गम अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
     तालुक्यात मागील आठवड्यापासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. मंगळवार दि-३० रात्रीपासूनच थंड वारे वाहू लागल्याने बुधवार पासून पाऊस पडण्याची दाट शक्यता वाटत होती.त्याप्रमाणेच बुधवारी पहाटेपासूनच अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने तालुक्याला झोडपून काढले आहे.या पावसात जनावरांचा चारा, भाताचे काड व बहुतांशी शेतकऱ्यांचे भात पीक भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
                         संतोष म्हस्के
To Top