शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे यांनी पुणे जिल्हा बँकेला दंड थोपटले ! बारामती मतदार संघातून अर्ज दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नजीक येऊन ठेपली आहे. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून १९९७ पासून बारामती पश्चिम भागाला संधीच मिळाली नसल्याने सतीश काकडे यांना सोसायट्यांच्या अ  वर्ग मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
             बारामतीच्या पश्चिम भागातून १९९२ ते १९९७ या कालावधीत कै. शिवाजीराव भोसले याना जिल्हा बँकेवर संधी मिळाली होती. त्यानंतर गेल्या २४ वर्षात या भागात अजून पर्यंत संधी देण्यात आली नाही. आज शेतकरी कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष सतीश काकडे यांनी बारामती सोसायट्यांच्या मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या दोन वर्षातील पवार कुटुंबियांशी त्यांची जवळकी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभेत मतदानरुपी मदत तसेच सोमेश्वर कारखाना बिनविरोधी बाबत सतिश काकडे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा बँकेसाठी सतिश काकडे यांचा विचार करणार का ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
To Top