'सोमेश्वर रिपोर्टर'च्या बातमीला यश ! 'साजिद'च्या वर्ग शिक्षकाने बातमी वाचली आणि 'साजिद' पुण्यातील घोरपडे पेठेतील आईवडीलांच्या कुशीत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---   
पुरंदर : प्रतिनिधी
गुरवार दि.३० डिसेंबर रोजी कोयना एक्सप्रेस मध्ये बसुन आलेला साजिद जावेद सय्यद हा निरा रेल्वे स्थानकात उतरला आणि निरा शहरात भटकू लागला ग्रामस्थ व युवकांनी सायंकाळी निरा पोलीस दुरक्षेत्रात हजर केला. पोलीस दुरक्षत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर व संदिप मोकाशी यांनी कंट्रोल रुमला कल्पना देत माध्यमांना ही माहिती दिली. सोमेश्वर रिपोर्टर पोर्टेलने तर बडतोब घटनास्थळी जाऊन सत्यता पडथाळत फोटोसह बातमी प्रसिद्ध केली. अवघ्या चार तासात पुणे घोरपडी पेठ येथून या मुलाचे पालक निरा पोलीस दुरक्षेत्रात येऊन रात्री दिड वाजता संदिप मोकाशी यांच्याकडून मुलगा ताबा घेतला व सर्वांनी श्वास सोडला.

   संदिप मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरवातीला हा मुलगा आपले नाव, पत्ता चुकिचे सांगत होते. पालकांचा मोबाईल क्रमांक ही सांगत नव्हता. ८ ते १० वर्षांचा मुलगा मोबाईल नंबर सांगत नाही म्हणजे मुलगा काहीतरी लपवतोय असा अर्थ होत होता. या मुलाच्या अंगावर शाळेचा युनिफॉर्म नसला तरी त्याच्य पायात शाळेचे बुट होते याचा अर्थ तो शाळेतून पळून आल्याचा अंदाज स्थानीक युवक व पत्रकारांनी व्यक्त केला होता. हा मुलगा कोयना एक्सप्रेसने मुंबई हुन आल्याचे सांगतान वडिल जुहु चौपाटीवर रिक्षा चालवतात हे खोटे सांगत असल्याचे लक्षात आले होते. 

सोशल मिडिया व सोमेश्वर रिपोर्टर पोर्टेलवर बातमी आल्यानंतर ही बातमी पुरंदर, बारामतीसह जिल्ह्यातील सर्व व्हॉट्सऍप ग्रुपवर गेली. या मुलाचे शिक्षक नितीन पोटे मुळ रहिवाशी बारामती तालुक्यातील सोमेश्वर नजिकच्या नऊ फाटा येथील आहेत. ते पुणे येथील घोरपडी पेठेतील शाळेत या विध्यार्थ्याला शिकवतात. त्यांनी रात्री सोमेश्वर रिपोर्टर व सोशल मिडियात या मुलाचा फोटो पाहून पालकांकडे विचारणा केली. पालक दिवसभर कामधंद्या निमित्ताने घराबाहेर असतात. ते रात्री उशीरा घरी आल्यावर मुलगा दिसून आला नाही शिक्षकांनी माहिती दिल्यावर त्यांनी ताबडतोब नाही रा पोलसी दुरक्षेत्रात धाव घेतली व संदिप मोकाशी यांच कडून मुलाचा ताबा घेतला.  
            निरा शहरातील युवकांनी रात्री आठ वाजल्या पासून या मुलाचे फोटो विविध माध्यमातून शेअर करत सामाजीक बांधिलकी दाखवल्याने सर्व थरातून या पोलीस, युवकांसह सोमेश्वर रिपोर्टर पोर्टेलचे कौतुक होत आहे.
To Top