बिग ब्रेकिंग ! तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागू

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्टर टीम - - - 
मुंबई  

मागील  काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार राज्यात करोनाचे ५ हजार ३६८ नवे बाधित सापडले आहेत. त्यामध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या तब्बल १९८ इतकी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील संभाव्य रुग्णवाढ टाळण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दि ३१ डिसेंबर अर्थात शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच राज्यात हे निर्बंध लागू केले जाणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागत कार्यक्रमांवर विरजण पडलं असून या निर्बंधांमुळे जाहीर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात येणार आहेत.

काल दिवसभरात आधी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि नंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्याचे सूतोवाच दिले होते. निर्बंधांबाबत मुख्यमंत्री आज किंवा उद्या निर्णय घेणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं होतं. यादरम्यान आता शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच हे निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली असून त्याबाबतचा शासन आदेश राज्य सरकारने काढला आहे.

असे असतील नवीन निर्बंध !
करोना काळात सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी ही सर्वात धोकादायक बाब ठरली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या जाहीर कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासोबतच, अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या ५० इतकी मर्यादित केली जाणार आहे. तसेच, अंत्यसंस्कारांसाठी देखील फक्त २० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे.
To Top