अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अमोल भोसले यांची तर पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी अभिजित जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- -
नुकतीच मोरगाव ता.बारामती येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघ या संघटनेचा जिल्हा कार्यकारणी निवड  तसेच भविष्यातील संघटने समोरील आव्हाने व त्यावरील रणनीती याअनुषंगाने आयोजित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
      अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष .राजेंद्र कोंढरे साहेब उपस्थित होते.आयोजित समारंभात संघटेमध्ये काम करत असलेल्या पदाधिकाऱ्यांना विविध पदे देवून गौरवण्यात आले.यामध्ये वाणेवाडी ता.बारामती येथील अमोल भोसले यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी तर वाकी ता.बारामती येथील अभिजीत हनुमंत जगताप यांची अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी  तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बारामती तालुका अध्यक्षपदि संभाजी गुलाबराव माने व युवक उपाध्यक्ष पदी शुभम खलाटे आणि स्वप्नील शिंदे  यांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाला बारामती, दौंड,पुरंदर, भोर,इंदापूर, वेल्हा,मुळशी या तालुक्यातून पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बारामती तालुका अखिल भारतीय मराठा संघातर्फे.राजेंद्र कोंढरे साहेब यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
To Top