सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिसड्स मावळ खोऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प.लक्ष्मण पारठे यांची मराठा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली .याबाबतची घोषणा मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी मोरगाव ता. बारामती येथील कार्यक्रमात केली.
लक्ष्मण पारठे हे मराठा महासंघाचे मागील काही वर्षांपासून सक्रिय कार्यकर्ते आहेत.त्यांना सामाजिक कार्याची आवड असून त्यांनी भोर बाजार समितीचे उपसभापती म्हणून काम पाहिले आहे.जिल्यात मराठा समाजाचे संघटन करून मराठा समाज घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेद्वारे प्रयत्न करणार आहे असे पारठे यांनी सांगितले.या निवडीमुळे पारठे यांचे भोर तालुक्यातून स्वागत होत आहे.