सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील आयडीबीआय बँकेत तीन ईसमांनी तब्बल ८८४.५० ग्रॅम खोटे सोने तारण ठेवून ३८ लाख १८ हजार ५०० रुपयांचे कर्ज घेतल्याचा प्रकार घडला असून बँकेची फसवणूक केली गेली आहे.विशेष म्हणजे ते सोने खोटे असल्याचे माहीत असतानाही ते खरे सोने असल्याचे बँकेने नेमलेल्या दोन सोनारांनी सांगितल्याने बँकेने हे कर्ज दिले होते त्यामुळे तीन इसम तसेच दोन सोनार असा पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विद्याधर माधवराव टापरे रा. टापरेवाडी ता. भोर यांनी ८८४ .५० ग्रॅम खोटे सोनी ठेवून बँकेकडून १४ लाख ८८ हजार ५०० रुपये कर्ज घेतले .आरोपी गणेश भागोजी माजगुडे रा.टापरेवाडी ता. भोर यांनी ६९३ ग्राम खोटे सोने ठेवून बँकेकडून १४ लाख ३० हजार रुपये कर्ज घेतले तर आरोपी नंबर ३) विकास संपत सावंत रा.टापरेवाडी ता.भोर सध्या राहणार धनकवडी पुणे यांनी २८४ ग्राम खोटे सोने ठेवून बँकेकडून नूतनीकरण करून ९ लाख रुपये कर्ज घेतले होते.वरील सर्व आरोपींनी आयडीबीआय बँक शाखा भोर ता. भोर जि.पुणे येथे एकूण १,८६१ ग्रॅम सोने ठेवून बँकेकडून एकूण ३८ लाख १८ हजार ५०० रुपये कर्ज घेऊन बँकेच्या विश्वासघात करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी नंबर४) नंदकुमार किसन कांबळे रा. रावळ चौक मंगळवार पेठ भोर,आरोपी नंबर ५)चेतन अशोक बेलापुरकर रा. पोस्ट ऑफिस शेजारी शिरवळ हे बँकेने नेमलेल्या सोनार असतानाही त्यांनी सदरचे सोने खोटे आहे हे माहीत असताना देखील सदर सोन्याची शुद्धता मूल्यांकन करून ते खरे असल्याचे प्रमाणपत्र देऊन विश्वास घात करून बँकेची फसवणूक केली आहे.म्हणून आयडीबीआय बँक शाखा भोर यांच्यावतीने बँकेचा प्रतिनिधी म्हणून कुंजन शारदानंद तिवारी बँक शाखा प्रमुख यांनी आरोपींविरुद्ध फिर्याद दिली आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.
संतोष म्हस्के