सोमेश्वर रिपोर्टर टीम--------- -
काल वर्तमान पत्रामधुन कारखाना एकरक्कमी F.R.P सभासदांना देणार ही बातमी वाचली. शुकवारी झालेल्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये F.R.P एकरक्कमी देणे बाबत ४ तास चर्चाही झाली. नविन संचालकांनी F.R.P एकरक्कमी देण्यासाठी आग्रह धरला असता चेअरमन यांनी काही मुद्दे उपस्थित केले परंतु संचालक मंडळाने त्यांचे सर्व मुद्दे खोडुन काढले व सर्व संचालकांनी धरल्यामुळेच चेअरमन यांना नाईलास्तव F.R.P एकरक्कमी देण्याचे जाहिर करावे लागले. त्यामुळे उशिरा सुचलेल्या शहानपणा बद्दल कृती समिती अभिनंदन करीत आहे. लावुन
वास्तविक मागील मिटींगमध्येच एकरक्कमी F.R.P बाबत निर्णय होणे गरजेचे होते. F.R.P ची जिल्ह्याची कोंडी सोमेश्वरनेच फोडणे अपेक्षीत होते. कारण चेअरमन वेळोवेळी कारखान्यावर कुठलेही कर्ज नाही सांगत होते. मागील तीन ते चार वर्षांमध्ये सभासदांना उच्चांकी भाव दिलेला आहे. तसेच चार वर्षांपुवी F.R.P देण्यासाठी सभासदांच्या उस बिलातुन कपात केलेले किंमत चढउतार निधीचे २० कोटी रूपये (बिनव्याजी) शिल्लक असताना जे फक्त उस बिला करीताच वापरता येतात असे असताना चेअरमन F.R.P एकरक्कमी देण्यासाठी टाळाटाळ का करीत होते? का वरील पैसे खर्च केले? याचा खुलासा चेअरमन यांनी करावा. तसेच चेअरमन यांना काही संचालकांनी किंमत चढउतार निधीच्या २० कोटी रूपयांचा हिशोब मागितला असता त्यास चेअरमन कडुन जाणीव पुर्वक बगल दिली गेली म्हणुन कृती समितीने २० कोटी रूपये निधी बाबत ही रक्कम नेमकी गेली कोठे याचा लेखी खुलासाही मागीतला आहे. व वेळ पडल्यास साखर आयुक्त कार्यालयातही दाद मागणार आहे. वास्तविक कृती समितीने नविन संचालक मंडळ असल्याने पहिली बोर्ड मिटींग होईपर्यंत म्हणजेच दि. ३० नोव्हेंबर पर्यंत फक्त F.R.P देणेबाबत मुदत दिली होती. परंतु आता कारखान्यास F.R.P विलंबाने दिल्याने त्याचे व्याज द्यावेच लागणार आहे. तरी सदर व्याज रक्कमेबाबत चेअरमन यांचे धोरण काय? याचा त्यांनी खुलासा करावा. व्याज देवून कारखान्याला तोषिश लागणार आहे. वास्तविक २० कोटी रूपये किंमत चढउतार निधी शिल्लक असताना केवळ चेअरमन यांच्या हट्टापाई एकरक्कमी F.R.P बाबत निर्णय झाला नाही म्हणुन सदर व्याजाची रक्कम ही चेअरमन व संचालक मंडळाच्या खिशातुन द्यावी अशी कृतीसमितीची मागणी आहे. कारखान्यास भुर्दड द्यायचे कारण नाही व यापुढे गळीत होणाऱ्या उसाची F.R.P एकरक्कमी विना विलंब द्यावी लागेल याची कृपया नोंद घ्यावी. जर व्याज देण्याची वेळ संचालक मंडळाने कारखान्यावर आणली तर त्याची जबाबदारी संचालक मंडळाला वैयक्तिक खिशातुन करावी लागेल. या संबंधी वेळ प्रसंगी मा.साखर आयुक्त कार्यालयात कृती समितीच्या वतीने दाद मागण्यात येणार आहे.
-----------------------
तसेच गेल्या ८ ते १० दिवसात कारखान्याचे गाळप सरासरी ६७०० ते ७००० पर्यंत होत असल्याने शेतकरी कृती समितीच्या वतीने चिफ इंजिनियर, चिफ केमीस्ट कारखान्यातील सर्व अधिकारी, कामगार वर्ग तसेच चेअरमन, कार्यकारी संचालक व संचालक मंडळ यांचे अभिनंदन!
सतीश काकडे- अध्यक्ष शेतकरी कृती समिती
COMMENTS