राज्यात अवकाळीचे ३४३० पशुबळी : एकट्या पुणे जिल्ह्यात २ हजार ४३ जनावरे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
 डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात सुमारे ३ हजार ४३० पाळीव जनावरे मरण पावली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक २ हजार ४३ जनावरे एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यांचे पंचनामे तातडीने करुन तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
        अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची माहिती देताना भरणे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे राज्यात पशुधनाची मोठी हानी झाली आहे. पुणे जिल्ह्यात २ हजार ४३ जनावरे मृत्युमुखी पडली. सातारा जिल्ह्यात २००, नाशिक जिल्ह्यात ५१५, अहमदनगर जिल्ह्यात ७१३, रायगड जिल्ह्यात २ अशी त्याची वर्गवारी आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
         अवकाळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेळ्या मेंढ्यांसाठी चार हजार रुपये, गायीसाठी चाळीस हजार रुपये, बैलांसाठी तीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. असे सांगून ते म्हणाले की, पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. काही अडचण असेल तर पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडे जावून पंचनामे करून घ्यावेत.
------------
जनावरांची आकडेवारी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका(७५०), आंबेगाव तालुका (४०३), शिरूर तालुका (३८१), पुरंदर तालुका (१५०), मावळ तालुका (११०), खेड तालुका(९४), बारामती तालुका (८८), दौड तालुका (४४), हवेली तालुका (२३) अशी पणे जिल्ह्यात मरण पावलेल्या जनावरांची आकडेवारी आहे.


To Top