सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ देविदास वायदंडे यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ वायदंडे हे काकडे महाविद्यालयात २० वर्षांपासून काम करत असून ते इतिहास विभागप्रमुख काम पाहतात. तसेच ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य म्हणून काम पाहतात. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे, सचिव जयवंतराव घोरपडे तसेच सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.