सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून शेतकरी कृती समितीचे नेते सतीशराव काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने अजित पवार यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाली.
पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामध्ये बारामती तालुक्यातून अ वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीशराव काकडे यांचाही अर्ज दाखल करण्यात आलेला होता. मात्र आज सतीशराव काकडे यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.