सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

२५ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा



मुंबई, दि. 21 :
 अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त छाया कुबल यांनी दिली.12 ते 17 डिसेंबर, 2021 रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

मुंबई शहर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

लॉकडाऊननंतर नव्याने व्यवसाय/उद्योग सुरु करताना जिल्ह्यातील आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्बळाची गरज निर्माण झाली असून स्थानिक बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील नामांकित उद्योजक/आस्थापनांमध्ये रिक्त असलेली विविध प्रकारची सर्वसाधारपणे 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर तसेच बीई व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी रोजगाराची संधी आहे. राज्यभरातून 25 हजार पेक्षा जास्त रिक्तपदांसाठी उद्योग/आस्थापनांमार्फत https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रिक्तपदे ऑनलाईन अधिसूचित करण्यात येत आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी नोकरी इच्छूक युवक-युवतींनी या वेबसाईटला भेट द्यावी. होमपेजवरील नोकरी साधक लॉगीन मधून आपआपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉबफेअर या बटनावर क्लिक करुन त्यातील ‘STATE LEVEL MEGA JOB FAIR 2021’ या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन उपलब्ध असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंतीक्रम नोंदवून रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्ह‍िडीओ कॉन्फरन्स अथवा टेलिफोनद्वारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.

या राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर येथे प्रत्यक्ष भेटीद्वारे अथवा या कार्यालयाच्या 022-22626303 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती कुबल यांनी केले आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6977,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : २५ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा
२५ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा
https://lh3.googleusercontent.com/-ZWAuJwuu5Hg/YcHiDVkUDxI/AAAAAAAAD0g/Kli_J9268CMKEK2Bn9t21HDV8dVW75_1wCNcBGAsYHQ/s1600/1640096265723610-0.png
https://lh3.googleusercontent.com/-ZWAuJwuu5Hg/YcHiDVkUDxI/AAAAAAAAD0g/Kli_J9268CMKEK2Bn9t21HDV8dVW75_1wCNcBGAsYHQ/s72-c/1640096265723610-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/12/blog-post_535.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/12/blog-post_535.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy