भोर ! थंडीचा कडाका वाढला : नागरिकांना दिवसाही घ्यावा लागतोय शेकोटीची आधार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून हवामान स्वच्छ होऊ लागल्याने थंडीच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.वाढत्या थंडीमुळे नागरिक दिवसाही शेकोट्या पेटवू लागले असल्याचे तालुक्यात चित्र आहे.
          तालुक्यात गेले चार दिवसांपासून तुरळक ढगाळ हवामान वगळता वातावरण स्वच्छ होऊ लागले आहे.दरम्यान याच काळात थंडी सकाळी,दिवसा भयानक पडू लागली आहे.वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी पूर्ण तालुका थंडीने गारठून गेल्याने नागरिक हुडहुडीने बेजार झाले आहेत.

To Top