सासवड दि.१३ ( वार्ताहर) लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय लोकनेते शिवाजीआप्पा पोमण यांची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून साकारलेल्या भव्य रक्तदान शिबिरात भिवरी गावचे सुपुत्र, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, शिक्षकनेते, हॉटेल लोणकरवाडा मालक सुनील लोणकर यांनी सलग १८ वेळा रक्तदान केले.
त्यांच्यासमवेत दौंडज गावचे सुपुत्र, समाजसेवी व्यक्तिमत्व सुदामआप्पा माळवदकर यांनीदेखील ह्यावर्षी रक्तदान केले. रक्तदान प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटक तसेच स्वर्गीय शिवाजीआप्पा पोमण यांची कन्या कु. शरयू पोमण व चिरंजीव शंभू पोमण उपस्थित होते. सुनील लोणकर यांनी महाविद्यालयीन जीवनापासून आतापर्यंत ५४ वेळा रक्तदान केले आहे.
२००४ साली लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 12 डिसेंबर रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त स्व. शिवाजीआप्पा पोमण यांनी सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन रक्तदान शिबिराचा संकल्प सोडला होता. तेव्हापासून सातत्याने हे रक्तदान शिबिर सुरू राहिले. या रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान करून हे शिबिर संपन्न होण्यास हातभार लावला आहे. काही दिवसापूर्वी शिवाजीआप्पा पोमण यांचे निधन झाले. सर्वजण शोकसागरात बुडाले. शिवाजीआप्पा पोमण यांच्यासारखे समाजसेवी व्यक्तीमत्त्व हरपल्याने समाजाचे फार मोठे नुकसान झाले. त्यांनी सुरू केलेल्या व त्यांच्या संकल्पनेतून साकारलेले रक्तदान शिबिर सातत्याने पुढे चालू राहावे याकरीता सर्वांनी मिळून यावर्षीही हे रक्तदान शिबिर आयोजित करून स्वर्गीय शिवाजीआप्पा पोमण यांना खऱ्याखुऱ्या अर्थाने भावपूर्ण अभिवादन केले आहे .या वर्षीच्या रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला