सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाघळवाडी ता बारामती येथील ग्रामपंचायतला जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या फंडातून घंटागाडी भेट देण्यात आली.
काकडे यांच्याहस्ते ही घंटागाडी ग्रामपंचायतला भेट देण्यात आली. यावेळी सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, माजी सरपंच रामचंद्र सकुंडे, सदस्य हेमंत गायकवाड ग्राम विकास अधिकारी नरसिंग राठोड, नबाजी सावंत, रामचंद्र गायकवाड, भगवान सावंत अंकुश सकुंडे सुभाष शिंदे लियाकत पठाण युवा कार्यकर्ते तुषार सकुंडे, गजानन सकुंडे, सरपंच नंदा सकुंडे उपसरपंच जितेंद्र सकुंडे व सर्व सदस्य यांनी गावातील वारंवार कचऱ्याची समस्या निर्माण होते त्यासाठी बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्याकडे मागणी केली व त्या संदर्भात लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून पाठपुरावा केला त्यामुळे आज ग्रामपंचायत वाघळवाडी ला कचरा वाहतुकीसाठी घंटा गाडी मिळाली
COMMENTS