सोमेश्वर रिपोर्टर टीम--- --
लोणंद : प्रतिनिधी
पाडेगाव ता फलटण येथील पवित्राबाई रघुनाथ बागडे यांच्या घराचा कडी कोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील रोकड आणि दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना आज दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
पाडेगाव येथील प्रसिद्ध सुक्या मासळीचे व्यवसायीक असलेल्या पवित्राबाई बागडे यांनी व्यापाऱ्यांना देण्यासाठी घरी कपाटात आणून ठेवलेले १ लाख ३० हजार रूपयांची रोकड आणि कपाटात असलेले अर्धा तोळे वजनाचे गंठण यांची अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस कडी तोडून घरात प्रवेश करून चोरून नेल्याची घटना घडली आहे. या चोरीची माहीती कळताच लोणंद पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला आहे. सदर घटनेचा तपास सपोनि विशाल के. वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलिस करत आहेत.