खंडाळा ! लोणंद नगरपंचायत रणधुमाळी : १३ जागांसाठी ७२ जण रिंगणात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद नगरपंचायत निवडणुकीसाठी चार ओबीसी प्रभाग वगळण्यात आल्यानंतर उर्वरित तेरा प्रभागासाठी एकुण १३४ अर्ज प्राप्त झाले होते  त्यापैकी आज झालेल्या छाननीत ३८ अर्ज बाद झाले असून एकुण ९६ अर्ज वैध ठरविण्यात आले असून २० उमेदवार बाद झाल्यानंतर एकुण ७२ उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात असणार आहेत. १३ डिसेंबर हि अर्ज माघारीची अंतीम तारीख असून तोपर्यंत आणखीन उमेदवार कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

आज झालेल्या छाननीत प्रभाग क्रमांक तीन मधील एकुण ६ उमेदवार वैध ठरले असून २ अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. तर प्रभाग क्रमांक चार मधील एकुण ११ अर्जापैकी ४ अर्ज बाद ठरवणार आले असून ७ उमेदवार पात्र ठरविण्यात आले आहेत,  प्रभाग क्रमांक पाचसाठी ८ उमेदवारांनी १० अर्ज दाखल केले होते त्यामधे ३ अर्ज बाद झाले असून ६ उमेदवार पात्र ठरले आहेत.  प्रभाग क्रमांक सहासाठी एकुण ६ उमेदवारांनी केलेल्या ७ अर्जापैकी १ अर्ज बाद होऊन ५ उमेदवार पात्र झाले आहेत.  प्रभाग क्रमांक सात मधील ११ उमेदवारांनी दाखल केलेल्या १४ अर्जापैकी ५ अर्ज बाद होऊन ८ उमेदवार रिंगणात आहेत.  प्रभाग क्रमांक आठ या अनुसुचित जमातीसाठी राखीव प्रभागात ३ उमेदवारांचे ४ अर्ज आलेले होते यापैकी काँग्रेसच्या निलम सावंत यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राष्ट्रवादीत आणि भाजपच्या दोघा उमेदवारात समोरासमोर लढत होणार आहे . प्रभाग क्रमांक नऊ साठी एकुण १२ उमेदवारांनी १९ अर्ज दाखल केले होते त्यापैकी सात अर्ज अपात्र झाल्यानंतर दहा उमेदवार मैदानात असणार आहेत , प्रभाग क्रमांक दहा साठी ७ उमेदवारांचे १० अर्ज आले होते त्यापैकी ३ अर्ज बाद होऊन ५ उमेदवार पात्र ठरले आहेत.  प्रभाग क्रमांक बारासाठी १२ उमेदवारांकडून १६ अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी ६ अर्ज बाद होऊन ८ उमेदवार पात्र झाले आहेत , प्रभाग क्रमांक तेरा साठी ४ उमेदवारांकडून ९ अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी एकही अर्ज बाद झाला नसून चारही उमेदवार निवडणूकीसाठी पात्र ठरले आहेत.  प्रभाग क्रमांक चौदा साठी ६ उमेदवारांकडून ९ अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी २ अर्ज बाद होऊन ५ उमेदवार पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक पंधरा साठी ४ उमेदवारांकडून ७ अर्ज प्राप्त झाले होते त्यातील ३ अर्ज बाद होऊन २ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र झाले असून इथेही दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे . प्रभाग क्रमांक सतरा साठी ५ उमेदवारांकडून ७ अर्ज दाखल करण्यात आले होते त्यापैकी १ अर्ज बाद होऊन ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहीले आहेत.
To Top