बारामती ! थोपटेवाडीच्या पठ्ठयाने युनियन बँकेतील सर्वांनाच कुलूप लावून कोंडले : कोऱ्हाळे बु l येथील प्रकार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील युनियन शाखेला बाहेरून कुलूप लावून कोंडल्याप्रकरणी थोपटेवाडी ता बारामती येथील एकावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. 
         याबाबत तेजस शाम महानुवर ,वय ३७ वर्षे, व्यवसाय नोकरी बँक मँनेजर ,रा तांबेनगर ,ता बारामती, जि पुणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी राजेद्रं रामचंद्र थोपटे ,वय ५६ वर्षे ,रा थोपटेवाडी ,ता बारामती ,जि पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 
 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी हे युनियन बँक आँफ इंडिया शाखा को-हाऴे बु।। येथील कार्यालयीन कामकाज करीत असताना  राजेद्रं रामचंद्र थोपटे वय ५६ वर्षे ,रा  थोपटेवाडी ,ता बारामती, जि पुणे, हा बँकेंत येवुन माझे ATM चे लोकेशनचे  काय झाले असे म्हणुन त्याने बँकेचे बाहेर असलेले लोंखडी शटरला त्याचेकडील कुलुप लावुन बँकेतील लोकांना आत कोंडुन बँकेत असलेले व बँकेच्या बाहेर उभे असलेले ग्राहकांची गैरसोय करुन बँकेचे व्यवहार थांबवुन बँकेचे कामात अडथऴा निर्माण केला आहे .म्हणुन फिर्यादीची त्याचे  विरुद्ध कायदेशिर फिर्याद आहे. पुढील तपास सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र फणसे करत आहेत.
To Top