सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील विसगाव , चाळीसगाव खोऱ्यांमध्ये बिबट्याने चांगलाच तळ ठोकला आहे.दोन महिन्यांच्या कालावधीत बिबट्याने ७ पाळीव जनावरांचा बळी घेतला आहे.परिसरातील शेतकऱ्यांचे लाखोंच्या घरात नुकसान होऊनही वनविभाग पिंजरा लावत नसल्याने तसेच उपाययोजना आखत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.बीबट्याने धुमाकूळ घालून एवढ्या मोठ्या घटना होऊनही वनविभाग दुर्लक्ष करीत वनविभाग सुस्तच असल्याचे चित्र आहे.
बिबट्याने विसगाव खोऱ्यातील वरवडी,पाले येथे गायी,शेळी,बकरे तर चाळीसगाव खोऱ्यात चिखलगाव व उंबर्डे येथील शेतकऱ्यांच्या शेळ्या,गायी असे एकूण ७ पाळीव जनावरांचा बळी घेतला आहे.तर आंबाडे ता.भोर येथे घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार कलेची घटना रविवार दि-५ पहाटेच्या वेळू घडली.बिबट्या रात्रीच्यावेळी गावात शिरून पाळीव प्राण्यांवर हल्ला करू लागल्याने गावागावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बीबट्याच्या दहशतीने परिसरातील शेतकरी घाबरून गेले आहेत.लवकरात लवकर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना आखाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनाकडून होत आहे.मात्र वनविभाग सुस्तच असून या घटनांकडे दुर्लक्ष करीत आहे असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.