बारामती पश्चिम ! विद्या प्रतिष्ठान मधील विद्यार्थ्यांनी केले जल्लोषात नववर्षाचे स्वागत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वर्षसमाप्ती व नववर्षाचे औचित्य साधुन विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कुल सी. बी. एस. ई., वाघळवाडी येथे इ १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वतः मधील कलागुणांना उत्स्फुर्तपणे सर्वांसमोर सादर केले. यावेळी इ १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र नियोजित वेळ व जागा ठरवुन देण्यात आली होती . सादरीकरणावेळी ४० विद्यार्थीच उपस्थित राहतील अशी काळजी घेण्यात आली होती. यामुळे आनंदाबरोबरच सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीचे भान राखत मुलांनी जुन्या वर्षाला निरोप दिला तर नवीन वर्षाचे स्वागत केले .

शाळा बंद असल्यामुळे मुलांमध्ये कमी झालेला आत्मविश्वास , सभाधीटपणा या गोष्टींना सकारात्मक पध्दतीने व्यासपीठ मिळवून देण्याचा शाळेचा प्रयत्न होता. मुलांना यामुळे पुन्हा उत्साहाच्या वातावरणाचा आनंद आपल्या वर्ग मिञांवरोवर घेण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन पाठक सर यांनी मुलांना नवीन वर्षाचा शुभसंकल्प करण्याचे आव्हान केले व सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेतील सांस्कृतिक विभागातील सौ. रूपाली कदम, श्री. संतोष जाधव, सौ. प्रिती जगताप व सौ. सारिका काकडे यांनी आपले योगदान दिले.
To Top