सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
फंड सांभाळ तुन्याला गं आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा... या अस्सल मराठमोळ्या लावणीची प्रचिती बारामती व इंदापूर तालुक्यातील उसाच्या फडावर नजर टाकली की उसाला तुरे आल्याने आपल्या लक्षात आल्याशिवाय राहात नाही.
२६५ जातीचा ऊस गाळपाला लवकर घेईनात. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. हमखास उत्पन्न मिळवून देणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली आहे. मात्र, आता ऊस वेळेवर कारखान्याला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे.
रिकव्हरी कमी असल्यामुळे २६५ च्या तोडीला कारखाने नाक मुरडत आहेत. त्यामुळे २६५ जातीचा ऊस शेतात मोठ्या प्रमाणावर उभा आहे. या जातीच्या उसाला तुरा येण्याचे प्रमाण मोठे आहे. यामळे ऊस आतून पोकळ झाला असून ऊस गाळपाला लवकर न गेल्यामुळे बारामती व इंदापूर तालुक्यातील उसाला तुरे आल्याचे पाहायला मिळत आहे.