बायकोच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
 लोणी काळभोर : प्रतिनिधी
विविध घरगुती कारणे व फ्लॅटचे कर्ज फेडण्याच्या कारणावरून सतत त्रास देऊन नवऱ्यास आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या बायकोविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         महावीर उत्तम जगदाळे (वय ३२, रा. नक्षत्र तारांगण सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील उत्तम श्रीरंग जगदाळे (वय ५८, रा. मु.पो. तरटगाव, ता. करमळा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली. त्यावरून रजनी महावीर जगदाळे (वय २८) हिच्याववर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
         वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर व रजनी यांचा विवाह २०११ मध्ये झाला आहे. त्यांना ५ व ३ वर्षांची दोन मुले आहेत. रजनी हिची बहीण संध्या गोपाळ शिंदे ही (उरुळी कांचन) या ठिकाणी राहण्यास असल्याने २०१८ मध्ये महावीर हा पत्नी रजनी व दोन्ही मुलांसमवेत ( उरुळी कांचन) येथे आला होता. तेथे तो मोलमजुरी करून उपजीविका करायचा. त्यानंतर एक वर्षाने कोरोना महामारीमुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे त्याला पूर्णवेळ काम मिळत नव्हते. त्यामुळे तो मिळेल तेथे काम करत होता. या कालावधीत पती पत्नीमध्ये स्वयंपाक व कारणावरून वाद होत होते. इतर नातेवाईकांनी त्यांना समजावून सांगितले. त्यानंतर फ्लॅटसाठी घेतलेले कर्ज फेडण्याच्या कारणावरून पुन्हा वाद होऊ लागले. म्हणून तो ऑगस्टमध्ये वडिलांकडे गेला, रजनी हिने तुझ्यासाठी काम पाहिले आहे, असे सांगून त्यास बोलावून घेतले. ९ नोव्हेंबर रोजी उत्तम जगदाळे हे ऊसतोडणी करिता गेले असता त्यांन सकाळी १० वाजण्याच्या सुमारास महावीर याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. असे समजले. ते तात्काळ (उरुळी कांचन) येथे आले. त्यावेळी महावीर यास ससून हॉस्पिटल येथे उपचाराकरिता नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. महावीर याच्या खिशामध्ये लिहिलेल्या चिठ्ठीत बायकोमुळे आत्महत्या केल्याचे त्याने लिहिले होते.
To Top