सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार संग्राम संग्राम थोपटे यांच्या विरोधातील उमेदवार शिसेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांचा अर्ज अवैध ठरल्याने तिसऱ्यांदा संग्राम थोपटे यांची हॅट्ट्रिक करीत बिनविरोध निवड झाली.
आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे सोसायटीच्या अ वर्ग गटातून अर्ज भरला होता.अर्ज छाननित शिंदे एकही सोसायटीचे संचालक नसल्याचे निदर्शनास आल्याने शिंदेंचा अर्ज अवैध ठरला.आमदार संग्राम थोपटे तिसऱ्यांदा बिनविरोध संचालक झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पहावयास मिळाला.थोपटे यांचे ७५ पैकी ५० हुन अधिक सोसायट्यांवर वर्चस्व असल्याने त्यांची निवड निश्चितच होती.