'भोर'च्या या गावात चक्क पोलीस बंदोबस्तात पार पडली तंटामुक्ती अध्यक्षपदाची निवडणूक प्रकिया

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
संतोष म्हस्के : प्रतिनिधी
भोर तालुक्यातील स्वर्गीय दादा कोंडके यांच्या इंगवली गावात शुक्रवार दि १० तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी निवडणूक लागली. 
        या पदासाठी एकूण पाच उमेदवारांचे अर्ज गावातून आले होते. यातील तीन जणांनी माघार घेतल्याने दोन उमेदवारांमध्ये निवडणूक लागली.यात संभाजी कारभळ यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी ९७ मतांनी विजयी झाले. या अटीतटीच्या निवडणुकीसाठी गावातील नागरिकांनी प्राथमिक शाळेमध्ये जाऊन मतदान केले. तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी मोहन अनंत किन्हाळे व संभाजी शिवाजी कारभळ या दोघांमध्ये निवडणूक झाली. एकुण मतदान ४९८ झाले असुन १७ मते बाद झाली. यामध्ये संभाजी कारभळ यांचा ९७ मतांनी विजय झाला. गावच्या सरपंच सारिका बांदल यांनी निवडणूकनिर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तसेच मुख्याध्यापक दलवाई , शिक्षक संदीप जगताप, भारती, देसले , पोलीस पाटील अमित कांबळे व ग्रामसेवक प्रसाद सोले यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले तसेच किकवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार अंकुश खोमणे यांनी बंदोबस्ताचे काम पहिले.
To Top