सोमेश्वर रिपोर्टर टीम------
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर, ता. बारामती जि.पुणे या कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. कारखाना निवडणुकी दरम्यान व ऑनलाईन सभेतही चेअरमन व M.D यांच्या सांगण्यावरून कारखान्याची विस्तारवाढ डिसेंबर अखेर जुनी मिल सुरू होईल व १५ जानेवारी पर्यंत कारखाना ९००० ते ९५०० मे. टन क्षमतेने चालणार आहे.
आपल्या कारखान्याची गाळप क्षमता ५००० मे.टन एवढी असताना गेल्या आठवड्याची आकडेवारी पाहता कारखान्याचे गाळप रोज सरासरी ६७०० ते ७००० मे. टनापर्यंत होत आहे. डिसेंबर पर्यंत कारखान्याची जुनी मिल चालु झाल्यास कारखान्याची २५०० मे. टनाची विस्तारवाढ झाल्यास जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्या पर्यंत कारखान्याचे रोजचे कशिंग ९००० ते ९५०० मे.टन होणार आहे. आपल्या कारखान्याकडे आज अखेर अंदाजे २७४०१ एकर लागणीची व ९४२३ एकर खोडव्याची नोंद आहे. असे एकुण ३६८२४ एकराची नोंद आहे. कारखान्याच्या सभासदांकडुन उसाच्या लागणीचे ३५ ते ३७ मे.टन व खोडव्याचे मागील ५ ते ७ वर्षाची सरासरी काढल्यास ३० ते ३२ मे.टन एकरी एव्हरेज मिळत आहे. म्हणजेच कारखान्याकडे अंदाजे १३,६२,४८८ एवढा मे. टन सभासदांचा उस कारखान्याकडे गाळपास उपलब्ध आहे. त्यातुन आज अखेरपर्यंत सभासदांचा २,९०००० मे. टन एवढा उस गाळपास आलेला आहे. तसेच गेल्या दिड महिन्यात सभासदांनी अंदाजे ४० ते ५० हजार मे. टन उस बाहेर दिला आहे अशी माहिती मिळते. तो वजा केल्यास कारखान्याकडे अंदाजे १०,२२,४८८ एवढा मे.टन उस गाळपास आहे. तसेच बिगर नोंदीचा अंदाजे २ लाख मे.टन आहे. त्या नोंदी त्वरीत घेण्यात याव्यात. हा सर्व विचार करता कारखान्याकडे नोंद असलेला व बिगर नोंद असलेला अंदाजे एकुण १२,२२,४८८ मे.टन उस आपल्या कार्यक्षेत्रात सभासदांचा असु शकतो. १५ जानेवारी २०२२ पासुन कारखान्याने रोजचे कशिंग ९००० ते ९५०० मे.टन होणार असल्याने मे २०२२ पर्यंत १२.८२,५०० मे.टन कशिंग कारखान्याचे होवु शकते. तसेच सभासदांचा नोंदीचा व बिगर नोंदीचा परिपक्व उस असल्याने कारखान्यास रिकव्हरी सुध्दा चांगली मिळु शकते. काही वर्षांपूर्वी कारखान्याने मे व जुन महिन्यात सुध्दा कशिंग केले होते याची मुद्दामहून कृती समिती संचालक मंडळास आठवण करून देत आहे. संचालक मंडळाने जुनी मिल सुरू झाल्यानंतर व्यवस्थित नियोजन केल्यास १५ लाख मे. टनापर्यंत गाळप होवु शकते. व तसे नियोजन चेअरमन व संचालक मंडळाने आतापासुनच करावयास हवे ही चेअरमन, M.D व संचालक मंडळाची खरी कसोटी आहे. कारण कारखाना, को-जन, डिस्टीलरी विस्तारीकरण करत असताना कारखान्यावर सहजिकच कोट्यावधी रूपयांचा कर्जाचा बोजा होणार आहे. संचालक मंडळाने नविन वर्षापासुन (२०२२) किमान ३ वर्ष १५ लाख मे.टन पर्यंत गाळप केले तरच कारखाना कर्ज मुक्त होईल असे वाटते. कारखान्याने नियोजन न केल्यास कारखाना विस्तारीकरणामुळे कारखान्यावर अजुन कर्ज आहे ही सबब चेअरमन व संचालक मंडळाने सांगुन प्रत्येक वर्षी इतर कारखान्यांच्या तुलनेत टनाला ५० प्रती मेटन जरी कमी देणार असतील तर ते कृती समिती व कारखान्याचे तमाम सभासद कदापीही खपुन घेणार नाहीत याची नोंद बेअरमन व संचालक मंडळाने घ्यावी. कारण कालच्या कारखाना निवडणुकीत अजितदादा यांच्या आशिर्वादाने, कृती समिती व सभासदांच्या सहकार्याने कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल १६००० मतांनी एवढ्या मोठ्या मताधिक्याने संचालक मंडळास निवडून दिलेले आहे. तसेच चेअरमन व नविन संचालक मंडळ कुठलाही खर्च न करता निवडुन आलेले आहेत याची जाणीव त्यांनी ठेवावी अशी विनंती आहे. म्हणुन चेअरमन व संचालक मंडळाने आता पासुनच सभासदांच्या हितासाठी काटकसर करावी व कारखान्यास वेळ दयावा.
तेव्हा कारखान्याच्या सर्व सभासदांना कृती समितीच्या वतीने आवाहन व विनंती करण्यात येत आहे की तुम्ही तुमचा उस कुठल्याही कारखान्यास देवु नये. उस तोडीस घोडासा विलंब जरी झाला तरी तुम्हाला, आम्हाला कारखान्याच्या हितासाठी सहन करावा लागेल. तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व कारखान्याची उसाची परिस्थिती पाहिल्यास सगळीकडेच उस जादा आहे. बाहेरील कारखान्यास जरी उस दिला तरी आपल्या कारखान्याची रिकव्हरी गेल्या ५० वर्षांपासुन जास्त आहे. पर्यायाने FRP ची रक्कम सुध्दा जास्तच मिळणार आहे. म्हणून सोमेश्वर ऐवढे बील मिळुच शकणार नाही. त्याचप्रमाणे बाहेरील कारखान्याच्या उस बिला बाबतही साशंकता आहे.
तरी चेअरमन व M.D यांना विनंती आहे की जर मे पर्यंत उसाचे गाळप होणार नाही असे वाटत असल्यास सोमेश्वर कारखान्या मार्फतच करार करून तो द्यावा सभासदांना वेठीस धरू नये. कारण गेल्या ७ ते ८ वर्षांत कारखान्यानेच ३ वेळा करार करून उस बाहेरील कारखान्यास गाळपासाठी दिला होता. त्यामुळे सभासदांनी कारखान्याच्या परस्पर उस बाहेरील कारखान्यास दिल्यास त्या कारखान्यांकडुन पैसे न मिळाल्यास त्यास जबाबदार कोण? म्हणुन सभासदांनी उस बाहेरील गाळपास देवु नये असे आवाहन व विनंती कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
------------------------
वास्तविक कारखान्याच्या संचालक मंडळात काही संचालक नविन असल्याने उस बाहेर देवु नये असे आवाहन (पत्रक) चेअरमन व M.D यांनी करावयास हवे होते. कृती समितीने नव्हे. का कारखान्याच्या जादा उसाबाबत चेअरमन व M.D यांना जबाबदरी झटकायची आहे? का विस्तारवाढीची खात्री वाटत नाही? का पद मिळाले म्हणुन?.
COMMENTS