Big breaking ! महाराष्ट्रातील या भागातील पहिली ते आठवीच्या शाळा पुन्हा लॉक ?

Pune Reporter

मुबई दि ३

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ आहे. अशावेळी मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा घेण्यात आला आहे. या नंतर आता मुंबई वगळता इतर विभागातील शाळा सुरुच राहणार असल्याची भूमिका शिक्षण विभागानं घेतली आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत राज्यातील शाळा आणि लसीकरणाचा आढावा घेतला. या बैठकीत कोरोना स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्यातील शाळा बंद न करता नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.
To Top