सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
आरोग्य , म्हाडा व टीईटी परीकक्षेच्या पेपर गैरव्यव्हाराची सुत्रे बारामती तालुक्यापर्यंत पोहचली आहेत .बारामती मोरगाव नजीक तरडोली येथील निखील वसंत कदम याचा या प्रकरणामध्ये समावेश आहे . त्याला न्यायालयात काल दि २ रोजी हजर केले असुन ४ जानेवरी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहेत
म्हाडा ,आरोग्य , टी.ई. टी. पेपर फुटीची चर्चा संपुर्ण राज्याच चांगली चर्चीली जात आहे .जी . ए . स्फॉटवेअरचा संस्थापक गणेशन हा पेपरफुटी प्रकरणी सायबर पोलीसांनी नोटीस बजाबली आहे . तर डॉ . प्रितीश देशमुख , आश्विनकुमार यांना अटक करण्यात आले आहे . या पेपर फुटीचे प्रकरणाची पाळेमुळे बारामती तालुक्यापर्यंत येऊन पोहचले .
या गुन्हामध्ये सहभागी असलेला निखिल वसंत कदम हा बारामती तालुक्यातील मोरगाव नजीक तरडोली येथील मुळचा तर सध्या पुणे येथिल काळेवाडीचा राहणारा आहे . निखिल याच्यासहीत आश्विनकुमार शिवकुमार , सौरभ महेश त्रीपाठी याला वरीष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांनी काल अटक करुन काल दि २ रोजी न्यायालयापुढे हजर केले होते . न्यायालयाने त्यांना उद्या दि ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . बारामती तालुक्यातील निखील याच्याकडील मोबाईलमध्ये आश्विनकुमार याला पाठविलेले ईमेल प्राप्त झाले आहेत . तसेच ५६ विद्यार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे . तर प्रत्येकी ४० हजार रुपये दिले असल्याचे नमूद केले आहे .