भोर ! सोमेश्वर रिपोर्टर बातमीचा इफेक्ट : बेभान रोडरोमिओंवर पोलिसांची कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के 
भोर तालुक्यासह शहरात गेल्या दोन महिन्यांपासून रोदरोमिओंनी चांगलाच उच्छाद मांडला होता .याचे वृत्त भोरला रोडरोमिओंचा उच्छाद असे सोमेश्वर रिपोर्टर यांनी वृत्त प्रसिद्ध करताच शनिवार दि-२२ भोर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी कारवाई करूनव दंड वसूल केल्याने बेभान रोदरोमिओंना चांगलाच चाप बसला आहे.
              पोलिसांनी शहरात व तालुक्याच्या महत्वाच्या वाहतुकीच्या रस्त्यावर ट्रिपल शीट,वेगाने वाहन चालावणाऱ्या ३० वाहनचालकांवर कारवाई करून २२ हजारांचा दंड वसूल केला.पोलीस ट्रिपल वाहन चालकांना अडवून दंड करीत आहेत याची माहिती शहरात पसरताच अनेक तरुण वाहनचालकांनी रस्त्यावर येनेच बंद केले. कारवाई करतेवेळी वाहतूक पोलीस शिवाजी काटे,आप्पा नवले व महिला पोलीस वर्षा भोसले उपस्थित होते.

To Top