कोरिया रिपब्लिकचा व्हिएतनामवर सहज विजय

Pune Reporter

 

पुणे, २१ जानेवारी २०२२ : 

कोरिया रिपब्लिक संघाने एएफसी वुमन्स आशिया कप भारत 2022 स्पर्धेच्या आपल्या मोहिमेस चांगली सुरवात केली. त्यांनी शुक्रवारी येथील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या सी गटातील सामन्यात त्यांनी व्हिएतनामचा 3-0 गोलने पराभव केला.

सामन्याच्या चौथ्या मिनिटाला जी सो युन हिने पहिला गोल केला. त्यानंतर व्हिएतनामला त्रान थी फुओंग हिच्याकडून झालेल्या स्वयंगोलचा फटका बसला. दुसऱ्या सत्रात चेल्सीची मध्यरक्षक जी हिनेच गोल करत कोरियाचा विजय साकार केला.

सामन्याच्या सुरवातीलाचा गोल करायच्यायाच उद्देशाने जणू कोरियाच्या मुली मैदानात उतरल्या होत्या. सुरवातीपासून त्यांनी कमालीचा वेगवान खेळ केला. तिसऱ्याच मिनिटाला चोए यु री हिने झकास धाव घेत आॅफसाईडची अडचण दूर केली. डाव्या बाजूने तिने मारलेली कीक गोलपोस्टला धडकून मैदानात परत आली तेव्हा सोन वा येआन ऑफसाइड ठरली. त्यामुळे त्यांचा हा पहिलाच प्रयत्न अपयशी ठरला. अर्थातकोरियाच्या खेळावर याचा काही एक परिणाम झाला नाही. त्यांनी उलट आणखी वेगवान खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवरील दडपण वाढवले. चोए हिने सुरेख धाव घेत जी सो यूनला हेरत पास दिला आणि कर्णधार जी हिने ही संधी साधून चेंडूला जाळीची दिशा देत कोरियाला आघाडीवर नेले.

कोरियासाठी आज चोए हिचा खेळ जबरदस्त झाला. व्हिएतनामचा बचाव भेदण्याचा आणि चाली रचण्याची सगळी जबाबदारी जणू तिने घेतली होती. सातव्या मिनिटाला पुन्हा एकदा तिने अशीच धडकी भरवणारी चाल केली. तिने पुन्हा एकदा सो कडे पास दिला. पणहवेतून आलेला पास क्लिअर करण्याच्या नादात व्हिएतनामच्या त्रान हिने केलेले हेडिंग चुकले आणि चेंडू त्यांच्याच गोलपोस्टमध्ये गेला.

कॉलिन बेल यांच्या कोरियन खेळाडूंच्या वेगवान खेळ आणि एकामागून एक होणाऱ्या आक्रमणाने व्हिएतनामची गोलरक्षक त्रान हिला सगळ्यात जास्त सतर्क रहावे लागले. सामन्यावर नियंत्रण मिळविल्यावर मात्र कोरियन खेळाडूंनी सामन्याचा वेग कमी केला. संपूर्ण खेळ व्हिएतनामच्याच बाजूला खेळला जात होता. त्यातही सामन्याच्या ३८व्या मिनिटाला त्यांना गोल करण्याची एक संधी मिळाली. त्या वेळी चुआँग थी किएऊ हिने मारलेल्या किकवर त्यांचे आक्रमक अचूक हेडर करू शकले नाहीत.

सामन्याच्या उत्तरार्धात ताएगुक यांच्या मुलींनी चेंडूचा ताबा आपल्याकडे राखताना आक्रमक खेळाचा प्रयत्न केला. व्हिएतनामच्या या पवित्र्यामुळे एकवेळ कोरियन खेळाडूंना जरूर रोखले होते. पणकोरियन मुलींना आणखी एक गोल जणू खुणावत होता. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या खेळाला वेग दिला . सामन्याच्या 74 व्या मिनिटाला गोल करण्याची संधी त्यांना त्यांना साधता आली नाही. व्हिएतनामच्या गोलरक्षक त्रान हिने त्यांना गोल करण्यापासून रोखले. दुसऱ्या सत्रात व्हिएतनामचा बचाव पूर्वाधार्पेक्षा अधिक तगडा झाला. पण79 व्या मिनिटाला चोऊंग हिच्याकडून गोलकक्षात चेंडू हाताळला गेल्याने कोरियाला पेनल्टी किक देण्यात आली.  ही संधी साधताना कर्णधार जी हिने अगदी मैदानालगत किक मारत कोरियाचा तिसरा गोल केला.

कोरिया आता सोमवारी आपली दुसरी लढत म्यानमारशी खेळेलतर व्हिएतनामचा सामना गतविजेत्या जपानशी होईल

To Top