धक्कादायक ! बारामतीत भरदुपारी महिलेवर चाकू हल्ला.

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्टर टिम - - - -
बारामती दि १८
टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या बुकिंग ऑफिस मध्ये काम करणाऱ्या एका महिलेवर चाकूहल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात घडला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून आरोपी या शोधासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत.यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा युवक काल देखील टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या ऑफिस बाहेर रेंगाळताना दिसला होता. आज दुपारी त्याने ऑफिसमध्ये प्रवेश करीत काल देखील मी आलो होतो पण ऑफीस बंद होते असं म्हणत काम करत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या गळ्यात असलेल्या दागिन्यांकडे हात नेला या महिलेला प्रतिकार केला असता तिच्यावर चाकूहल्ला करत हा युवक पळून गेला. ऑफिसच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये या युवकाचे चित्रीकरण झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान, या महिलेच्या करंगळीला दुखापत झाली आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. हा हल्ला कोणत्या कारणासाठी झाला याचा शोध मात्र अद्याप लागलेला नाही.
To Top