बारामती पश्चिम ! तहानलेल्या शेरेवाडीला 'जानाई'चा आधार : एक तलाव, तीन बंधारे पाण्याने तुडुंब

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
 जानाई योजनेतून पाणी सुटले की शेरेवाडी हे जानाईच्या पाण्यापासून वंचित राहत होते.  आणी ग्रामस्थांना दुष्काळामुळे बिकट परिस्थितीला समोर जावं लागत होते. मात्र आता शेरेवाडीतील तलाव आणि बंधारे जनाईच्या पाण्याने भरल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 
                    प्रत्येक वेळी जनाई योजनेतून पाणी सुटले की शेरेवाडी हे जनाईच्या पाण्यापासून वंचित राहत होते आणी ग्रामस्थांना दुष्काळामुळे बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागत होते ही खंत श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक प्रचारावेळी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष नानासो लडकत आणि गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आणि जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांच्या कानावर घातली होती त्यावेळी या दोन्ही मान्यवरांनी 'ज्यावेळी जनाई योजना सुरू होईल त्यावेळी सर्वात आधी पाणी शेरेवाडीला दिले जाईल' असा शब्द दिला होता. त्या शब्दाची शब्दपूर्ती आज पूर्ण झाली. आठ दिवसांपूर्वी जनाई योजना सुरू होऊन शेरेवाडीला प्रथम पाणी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिलेला शब्द पाळल्याने गावच्या नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले. जनाई योजनेतून काल एक तलाव आणी तीन बंधारे तुडुंब भरले. या पाण्याचे जलपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कौले यांच्या शूभहस्ते पार पडले. यावेळी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष नानासो लडकत, माजी सरपंच आप्पासो लडकत, अंकुश लडकत, बनाजी लडकत, नाना लडकत, सचिन लडकत,आप्पा तिडके, लक्ष्मण पोमणे, राजकुमार लव्हे, गोविंद बाचकर, दत्तात्रय ढोपरे, प्रकाश लोणकर, नितीन लडकत, राहुल लडकत, विशाल लडकत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाणी व्यवस्थितपणे आणण्यासाठी शेरेवाडीतील तरूण वर्गाने गेली आठ दिवस विशेष सहकार्य केले. या सर्व तरुण वर्गाचे मान्यवरांनी जाहीर कौतुक केले.
To Top