सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे - ओमायक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे मुंबई पाठोपाठ पुणे शहरातील पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आढावा बैठक पार पडली. यामध्ये पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.