सोमेश्वर रिपोर्टर टीम
सोमेश्वरनगर दि ४
बारामती तालुक्यातील मुरूम येथे न्यू इंग्लिश स्कूल मध्ये आरोग्य विभागाच्या वतीने 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना कोव्हँक्सिन या डोसचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये एकूण 60 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.
यावेळी या लसीकरण सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक राजवर्धन दादा शिंदे, सरपंच इंदुमती भगत, निलेश शिंदे माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य नलिनीताई जगताप, राणीताई माहुरकर, हरिश्चंद्र जगताप तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री कांबळे सर, पर्यवेक्षक चव्हाण सर, छोटेसाहेब जगताप, बबन कदम, आरोग्य सेविका लकडे सुनिता, आरोग्य सेवक फिरोज मुलानी, सी एच ओ पल्लवी भोसले, जनसेवा प्रतिष्ठान भारती जाधव, मीना मोहिते तसेच शाळेचे शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते .
यावेळी राजवर्धन शिंदे यांच्या वतीने मुलांना पॅरासिटॅमॉल च्या पाचशे गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. होळ आरोग्य केंद्राचे डॉ.राजगे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाली