बारामती पश्चिम ! सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्ताने विविध स्पर्धांचे आयोजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : ता. बारामती येथील श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात १८व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती आज दि.३ जानेवारी रोजी त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन  मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीच्या लेकी सर्व महीला कर्मचारी-शिक्षीका तसेच प्राध्यापकवर्ग,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
     जोतिबांच्या प्रत्येक कार्यात हिरीरीने भाग घेणाऱ्या सावित्रीबाईंचे ‘स्त्रियांनी शिकावे’ हेच ब्रीदवाक्य होते.  यावेळी विविध क्षेत्रातील यशस्वी महीला व शिक्षणात आघाडीवर असणा-या विद्यार्थीनी पाहता क्रांतीज्योती सावीत्रीबाईंचे दिडशे वर्षांपुर्वीचे स्वप्न आज वास्तवात उतरत असल्याचे समाधान प्राचार्य धनंजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. मयुरी यादव यांनी म्हटले की, आज जरी सावित्रीबाई आपल्यात नसल्या तरी त्यांच्या कार्याचा अंत झालेला नाही,असं म्हटलं जात की आयुष्य जरी थोडे असले तरी तेवढ्या आयुष्यात आपण काय करतो ते महत्वाचे आहे, आपल्या अल्पशा आयुष्यामध्ये सावित्रीबाईंचे कार्य महान व आजही अजरामर आहे म्हणुनच त्यांना क्रांतीज्योती असे म्हटले जाते. 

सावित्रीबाईंच्या १९१ व्या जयंतीनिमीत्ताने सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात 'निबंध स्पर्धा' व 'देशभक्तीपर रांगोळी स्पर्धेचे' आयोजन ७ जानेवारी रोजी करण्यात आले आहे, या स्पर्धांमध्ये सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयामार्फत करण्यात आले आहे.
To Top