सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील काळखैरेवाडी ते लोणीपाटी हा राज्य महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा झाला. सार्वजनिक बांधकाम विभागामुळे प्रवाशांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर गेल्या सहा महिन्यात साठच्यावर या रस्त्यावर अपघात झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत.
गेली सहा महिने झाले रस्त्याचे टेंडर निघालेले वारंवार तक्रार करूनही ना ठेकेदार दखल घेत आहे ना बांधकाम विभाग गेली तीन महिने झाले रोडवर फक्त देखाव्यासाठी खडी आणून टाकली आहे. ही खडी पूर्ण रस्त्यावर पांगली आहे याच खडीवरून रोज एक तरी मोटारसायकल घसरून पडत आहे कालच या रस्त्यावरून घसरून शिरूर येथील एका वीस वर्षीय मूलीचा हात फॅक्चर झाला आहे एक महीन्यापूर्वी काळखैरेवाडी या ठिकाणी भरपूर तक्रारी केल्यानतर संबंधित ठेकेदाराने रडत असणार्या लहान मूलाला चाॅकलेट देऊन जशी समजूत काढतात तसी रोडला थोडीसी मलमपट्टी केली आणी आठच दिवसात पुन्हा जैसेथे परिस्थिती झाली आहे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तर तो अधिकारी तक्रार करणार्याचा मोबाईल नंबरच ब्लाॅकलिस्ट मध्ये टाकत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तालुक्यातील अधिकारी जर एवढे मस्तावलेले असतील मग न्याय कुठे मागायचा अशा संतप्त प्रतिक्रिया आता प्रवासी आणि येथील नागरीक बोलत आहेत आता जर लवकर काम सूरू नाही झाले तर बारामती पुणे रोडवर लोणीपाटी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाला जर हिंसक वळण लागले तर याची सर्व जबाबदारी ही बांधकाम विभाग यांची राहील असा इशारा येथील प्रवासी आणि नागरीक यांनी दिली आहे.