वाई ! सटालेवाडी येथील तरुणाचा अपघातात मृत्यू : तालुक्यात मागील सहा दिवसात वेगवेगळ्या अपघातात चार ठार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी  
परखंदी ता.वाई कसाबकळी मार्गे वाईला येणार्या रोडवर असणार्या शंकराच्या मंदिरा जवळ एका भरघाव वेगात आलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भिषण अपघातात  दुचाकीवरील प्रतीक राजेंद्र ओंबळे
वय २० वर्ष राहणार सटालेवाडी ता.वाई याचा 
जागीच मृत्यू झाला  याचा गैरफायदा घेऊन टेम्पो चालक टेम्पोसह पळून गेला पण वाई पोलिसांनी काही तासातच पळून गेलेला टेम्पो आणी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या वर गुन्हा दाखल केला आहे .
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मयत  प्रतीक हा आपल्या दुचाकी वरुन सटालेवाडीहुन वाई बाजु कडे कसबाकळी रोड मार्गे एम.एच. ११ सी.वाय.५७५२ या क्रमांकाच्या दुचाकी वरुन येत असताना त्याची दुचाकी रोडवर असणार्या शंकर मंदिरा जवळ आली असता समोरुन भरघाव वेगात एम.एच.११ ऐ.टी. ०१५८ या टेम्पोने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याने सटालेवाडी गावावर शोककळा पसरली आहे .
सटालेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई 
पदावर काम करणारे राजेंद्र पांडुरंग ओंबळे यांचा तो एकुलता एक मुलगा होता .आर्मीत भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते त्या साठी तो नेहमीच सराव करीत होता एक सज्जन तरुण म्हणून गावात त्याची वेगळी ओळख होती .गेल्या पाच सहा दिवसा पासून वाई तालुक्यात अपघातांच्या सुरु झालेल्या मालिकेत आज अखेर चार तरुणांचा मृत्यू झाल्याने वाई तालुका हादरला आहे .
To Top