कर्मचाऱ्यांची सांख्यिकी माहिती ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

Pune Reporter

            पुणे,दि.६

 जिल्ह्यातील शासकीयनिमशासकीयसार्वजनिक उपक्रम आदींसह खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुषस्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावीअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

 

            डिसेंबर २०२१ अखेर संपणाऱ्या तिमाहीचा नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाद्वारे सुरू आहे. त्याला सर्व आस्थापनांनी प्रतिसाद देत माहिती भरावी यासाठी आस्थापनांना यापूर्वी दिलेल्या युझर नेम व पासवर्डचा वापर करून प्रत्येकाने www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करावे आणि आपली अचूक माहिती ऑनलाईन पद्धतीने सादर करावी. तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ३० जानेवारी २०२२ आहे.

            सर्व आस्थापनांनी तिमाही विवरणपत्र मुदतीत ऑनलाईन पद्धतीने सादर करावे व प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्ययावत करावा. यासंबंधी संपर्कासाठी punerojgar@gmail.com किंवा asstdiremp.pune@ese.maharashtra.gov.in या ईमेल पत्याकाचा वापर करावाअसे सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी कळविले आहे.

To Top