'बारामती'च्या सुपुत्राचा आग्र्यात डंका : महाराष्ट्रातर्फे खेळताना पटकावला 'बेस्ट बॅट्समन'चा किताब

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील इंद्रनील शरद जगताप याने अंडर १४ क्रिकेट संघातून खेळताना आग्रा येथे पार पडलेल्या २०-२० क्रिकेट स्पर्धेत 'बेस्ट बॅट्समन' चा किताब पटकावला. 
           नॅशनल ऑलम्पिक गेम्स फेडरेशन कप २०२२ तर्फे दि ७ ते ११ या दरम्यान या स्पर्धा आग्रा आणि मथुरा येथील हरदयाळ स्टेडियम याठिकाणी पार पडल्या. यामध्ये   महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक राज्यासह १० राज्यातील संघांनी सहभाग घेतला होता. यासर्धेत मध्यप्रदेश संघाबरोबर खेळताना इंद्रनील जगताप याने वयक्तीक ४८ धावा तर उत्तरप्रदेश संघाबरोबर खेळताना वयक्तिक ४३ धावा पटकावला. ही धावसंख्या वयक्तिक सर्वाधिक धावसंख्या ठरली.  तसेच इतर संघबरोबर खेळताना इंद्रनील जगताप याने दोन वेळा खेळताना ९१ धावा करून बेस्ट बॅट्समन चा 'किताब  पटकावला.
To Top