बारामती ! करंजेपुल ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अजित गायकवाड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील करंजेपुल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अजित आप्पासाहेब गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
           उपसरपंच निलेश गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदी अजित गायकवाड यांच्या एकमेव अर्ज आल्याने याठिकाणी त्यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. 
         यावेळी सोमेश्वर चे मा कामगार संचालक, बाळासाहेब गायकवाड, सरपंच वैभव गायकवाड, अनिल गायकवाड, सागर गायकवाड, हरिष गायकवाड, निलेश गायकवाड, समीर शेंडकर, लतीफ मुलाणी, संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुजाता अगवणे यांनी काम पाहिले.
To Top