हातांच्या बोटांच्या शस्त्रक्रियेबाबत स्वतंत्र तंत्र विकसित करणारे डॉ. विजय माळशिकारे यांना फेलोशिप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
पुणे येथील हँड सर्जन असलेले डॉ. विजय माळशिकारे यांना नुकतीच रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन ऑफ ग्लास्गो यांच्याकडून फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. 
         ही फेलोशिप अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाते. या फेलोशिपसाठी पदवी घेतल्यानंतर हातांवरील निवड प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. गेल्या १० वर्षांपासून पुण्यात डॉ. माळशिकारे हातांची शस्त्रक्रिया करीत आहेत. पुणे विद्यापीठातून एमबीबीएस विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांचे फ्रान्समध्ये जाऊन शिक्षण घेतले आहे. हातांच्या बोटांच्या शस्त्रक्रियेबाबत त्यांनी स्वतंत्र तंत्र विकसित केले आहे. हातांवरील विविध शस्त्रक्रिया करताना त्यांनी त्याबाबत संशोधन केले आहे. ही फेलोशिप प्रदान करताना त्यांच्या संशोधनाच्या कामगिरीचाही विचार करण्यात आला आहे.
To Top