डायरेक्टर साहेब.. माझा ऊस कधी जाणार ......! 'सोमेश्वर'च्या संचालकाला थेट लंडनवरून फोन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखण्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांना थेट लंडनवरून फोन येतो...पलीकडचा माणूस म्हणतो डायरेक्टर साहेब माझा ऊस कधी जाईन.. थोडा वेळ बुचकळ्यात पडलेले ऋषिकेश गायकवाड यांना आपल्या कारखान्याचा सभासद लंडन येथे आहे हे समजले. 
             एकंदरीत घडले असे चौधरवाडी येथील सोमेश्वर कारखान्याचे सभासद संपत पवार हे लंडन स्थायिक असलेल्या आपल्या मुलाच्या घरी हवा पालटासाठी गेले आहेत. ते एप्रिल महिन्यात गावाकडे येणार आहेत. मात्र ते लंडनला गेले तरी म्हणतात ना शेतकऱ्यांचा जीव वावरातच गुंतलेला असतो.आपला ऊस शेतात उभा हे शेतकऱ्यांला कसं पाहवणार. दि २० रोजी रात्री ११ वाजता ऋषिकेश गायकवाड यांचा फोन खणखणतो पलीकडून आवाज येतो मी संपत पवार बोलतोय लंडनवरून ..मी आपल्या कारखान्याचा सभासद असून चौधरवाडी येथील स्थायिक आहे. माझा १० व्या महिन्यातील ऊस आहे. आता तोडून नेयचा म्हणटले तर किती कपात होईल. कारण मी आलोय मुलाकडे लंडनला आम्हाला पाण्याचा प्रश्न आहे. लवकर ऊस न्या. अशी विनंती केली यावर संचालक गायकवाड यांनी पवार यांच्या सर्व शंकांचे निरासन केले.
To Top