बारामती दि २३
पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा राज्यासह बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील वातावरणावर परिणाम दिसून येत आहे. सकाळपासून राज्यातील मुंबई,पुणे,पालघर आणि आसपासच्या शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. तर सायंकाळपासून बारामती तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये हवेमध्ये धुळीचे कण दिसून येत आहेत.
हवेमध्ये गारवा असून हवेचा वेग पश्चिमेकडून पूर्वेकडे
वाढला आहे .
धुळीचे वादळ पाकिस्तान मधील कराची मध्ये आले होते ते आता राजस्थान आणि गुजरात दिशेने सरकत आहे. त्यामुळेच वातावरणात सकाळपासून मळभ आणि धूळ दिसून येत आहे.आज दि २३ सायंकाळी त्याची तीव्रता जास्त प्रमाणावर दिसून येत आहे.
या वातावरणाचा नागरीकांच्या प्रकृतीवर काय परिणाम होणार तसेच शेतीपिकांवरही कोणता परिणाम होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे