सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर परिसरातील दरेकर मळा येथील रहिवासी असलेला कु. अक्षय बाळासो राऊत यांची मुंबई पोलीस हवालदार पदी निवड झालेली आहे. वडील बाळासो राऊत व मोठा भाऊ पंकज राऊत सलून चा व्यवसाय करत घर खर्च भागवत या अपुऱ्या मिळकत मधून मधून अक्षयला पुरेसे पैसे मिळत नसत,पण जिद्द व संयम व प्रामाणिकपणा करण्याची इच्छा होती. त्यामुळे कंपनीमध्ये नोकरी करून अभ्यासासाठी लागणारा खर्च भागवीत असे.अगदी परिस्थितीने व समाजाने दिलेली शिकवण खूप शिकवून जाते असते. अक्षय म्हणाला तसेच आई वडील यांच्या कष्टाची जाणीव होती म्हणून मी माझा संयम व जिद्द सोडली नाही. तसेच तरुणांना संदेश देताना कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी संयम व जिद्द व व प्रामाणिक कष्ट करावे असे सांगितले. हा ओबीसी वर्गातून प्रथम आलेला आहे. नागेश्वर अकॅडमी मालेगाव मधील विठ्ठल सर यांचे योग्य मार्गदर्शन व कष्टाळू मित्र यांचे सहकार्य लाभले आहे, आनंद गगनात मावेना असे सांगितले.