भोर : गावठाणाच्या मालमत्तेचे अत्याधुनिक सर्वेक्षण होणार : आमदार संग्राम थोपटे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
ड्रोन सर्वेक्षणाद्वारे नागरिकांना गावठाणांची अचूक माहिती मिळणार असून या अनेक बाबीमधील होणारे वाद-तंटे थांबणार आहेत. कया सर्व्हेचा फसवणूक टाळण्यासाठी सर्वार्थाने मदत होणार असून गावठाणाच्या मालमत्तांचे अत्याधुनिक सर्वेक्षण होणार आहे असे कापूरव्होळ ता.भोर येथे सुचना विज्ञान केंद्र यांच्या स्वामित्व योजने अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण सर्व्हेक्षणाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार संग्राम थोपटे बोलत होते. 
या ड्रोन सर्व्हेक्षणामुळे गावठाणातील सर्व मालमत्तांचे अत्याधुनिक सर्व्हेक्षण होऊन प्रत्येक घराचा नकाशा, सीमा व क्षेत्र यांची अचुक माहिती मिळणार आहे.मालमत्ता अधिकार पुरावा मिळकत पत्रिका स्वरुपात मिळणार आहे. कर्ज उपलब्धता, विविध आवास योजनेस मंजुरी घेण्यासाठी जागेचे मालकी हक्क तंटे-वाद उद्भवणार नाहीत.जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार फसवणूक टाळण्यासाठी यासर्व्हेचा सर्वार्थाने मदत होणार असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी ,विशाल तनपुरे, पंचायत समिती उपसभापती रोहन बाठे, कापुरव्होळचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
To Top