बारामती पश्चिम ! ट्रकच्या धडकेत क्रेटातील तीन जण गंभीर जखमी : सुपे - मोरगाव रस्त्यावरील अपघात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : दीपक जाधव
 अहमदनगर येथील खडकी येथुन जेजुरीच्या दर्शनासाठी निघालेल्या मात्र चहासाठी थांबलेल्या हुंडाईच्या क्रेटा गाडीला मालवाहतुक दहा चाकी ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले तर काही जण किरकोळ जखमी झाल्याची झाल्याची घटना सोमवारी ( दि. २४ ) सकाळी साडेसातच्या दरम्यान सुपे मोरगाव रस्त्यावरील डायमंड ढाब्यानजीक घडली. 
       या अपघातात क्रेटातील नवनाथ रोकडे, बाबासाहेब वाडेकर आणि स्वाती रोकडे ( सर्व राहणार खडकी, अ. नगर)  हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना डोक्याला, खांद्याला, पाठिला, कंबरेला तसेच पायांना जबर मार लागला आहे. तर काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती क्रेटातील महेश काळे यांनी दिली. 
     काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रेटा क्रमांक ( एम एच १६ सी व्ही ९४५६ ) आणि झायलो  क्रमांक ( एम एच १६ ए टी ५२०५ ) या गाड्या अहमदनगरहुन जेजुरी येथील खंडोबा दर्शनासाठी निघाल्या होत्या. या दोन्ही गाड्यातुन लहान मुलांसह मोठी माणसे मिळुन १२ ते १३ जण प्रवास करीत होती.  दरम्यान सुपे येथील डायमंड ढाब्यावर चहासाठी थांबुन परत गाडीत बसत असताना चौफुला बाजुने जोरात आलेल्या ट्रकने क्रमांक ( आर जे १४ जी के ८५८२ ) डायमंड जवळ थांबलेल्या क्रेटा धडक दिली. तर धडक ऐवढी जोरात होती की क्रेटा झायलोवर जोरात आदळल्याने झायलो रस्ता ओलांडून दोनशे मिटरवर जावुन थांबली. यावेळी अपघात होताच ट्रक चालक पसार झाला. तर क्रेटात बसलेले चौघे जण जखमी झाले. त्यांना सुपे ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन चौफुला येथील साई दर्शन हॉस्पिटलला हलविण्यात आले. मात्र त्यातील तीन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील संचिती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आल्याची माहिती महेश काळे यांनी दिली. 

           
To Top