सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जेजुरी : प्रतिनिधी
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सदर अर्थसहाय्य एकदाच पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे . पात्र प्रयोगात्म क्षेत्रातील एकल कलावंतांनी संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी यांच्याकडे अर्थसाहाय्य साठी अर्ज करावा असे आवाहन पुणे जिल्हा वृद्ध कलावंत समितीच्या वतीने करण्यात आले आहे .
पात्र एकल कलावंतांनी अर्जामध्ये दिलेल्या अटींची पूर्तता करून फॉर्म पंचायत समितीमध्ये जमा करावेत, नमूद केलेली माहिती सत्य असावी, खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्यास सर्वस्वी अर्जदार जबाबदार राहील. कलाकारांनी व साहित्यिकांनी अर्जात दिलेल्या माहितीचे तंतोतंत पालन करावे. सर्व तालुक्यतील पंचायत समिती मध्ये अर्थ साहाय्याचे अर्ज मिळतील अशी माहिती मानधन समितीचे अध्यक्ष शशिकांत कोठावळे यांनी दिली.
पुणे येथे झालेल्या या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा निवड समिती पुणे जिल्हा परिषद भारत शेडगे व पुणे जिल्हा मानधन समितीचे सदस्य आनंद तांबे महाराज , चित्रपट अभिनेते अभय वाव्हळ, सदस्य संजय सावंत तसेच अधिकारी गायकवाड उपस्थित होते.